गाज येता गो - मला काहीच प्रॉब्लेम नाही

चित्रपट- मला काहीच प्रॉब्लेम नाही 
संगीत- हृषिकेश-सौरभ-जसराज 
गीत- गुरु ठाकुर
स्वर- बेला शेंडे 



तुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो
कानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो
फेसाळली लाट
वेडी पायवाट
कानी येती आज पायजणां
मायेचा पदर
फुलला मोहर
पानो पानी सूख माइना
चोरपावलानी
हळू येता कोणी
डोळ्याच्या काठानी
ऊनहून पाणी
तेची टिपूर टिपूर चाहूल दिता गो
तुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो
कानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो
अंतरा - १
जाईजुई चाफा - वा-यावर तेचो दर्वळ गो
रानभर हाका - अजून तुला देती अोहळ गो
जाईजुई चाफा
रानभर हाका
दारात सायली तुझी सय सांगते 
चिमणीचा खोपा
पारंबीचा झोका 
तुळस अंगणी तुझी वाट पाहते

नादावली सये आज पुन्हा पाउले
गंध सा-या या आठवणींचा उरी
वळीव भरुन भरुन येता गो 
तुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो
कानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो

Comments